बलिप्रतिपदेला गाई-बैलांचे पूजन करून तरुणांनी जपली संस्कृतीची परंपरा
गाई-बैलांना रंगीबेरंगी सजावट
दिगंबर चंदने | मानकिवली, कडाव:
दिवाळी हा सण आनंद, उत्साह आणि परंपरेचा संगम मानला जातो. या सणामध्ये बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व असून, ग्रामीण भागात या दिवशी पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अनोखी परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जाते. याच परंपरेला उजाळा देत कर्जत तालुक्यातील मानकिवली गावात बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्यानिमित्त गुरांचे पूजन करून मोठ्या उत्साहात गुरांची दिवाळी साजरी करण्यात आली.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0020,0.0000;
brp_del_sen:0.1300,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (0, 0);aec_lux: 104.99533;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 41;
कडाव ग्रामपंचायत हद्दीतील मानकिवली गावातील तरुणांनी पुढाकार घेत गावातील गाई, बैल, वासरे आदी पशुधनाची विधिवत पूजा केली. त्यानंतर गाई-बैलांना विविध रंगांनी सजवून, त्यांच्या अंगावर आकर्षक रंगकाम करून पारंपरिक पद्धतीने त्यांची दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते. तरुणांसह ग्रामस्थांनीही या पारंपरिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0055,0.0000;
brp_del_sen:0.1300,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (200, 0);aec_lux: 112.86659;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 37;
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पूर्वापार चालत आलेली गवत आणि आतिषबाजीची परंपरा. या प्रथेनुसार रस्त्यावर गवत अंथरले जाते. त्यानंतर गवत पेटवले जाते आणि त्यावरून गाई-बैलांना नेण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. मुकी जनावरे, गाई, बैल, वासरे तसेच म्हशी व त्यांच्या वासरांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहू नये, त्यांना संकटांचा सामना करण्याचे बळ मिळावे आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, अशी यामागील पारंपरिक भावना असल्याचे सांगितले जाते.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0050,0.0000;
brp_del_sen:0.1300,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 37;
शेतीच्या कामात शेतकऱ्यांना मोलाची साथ देणाऱ्या पशुधनाप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. शेतकऱ्यांच्या जीवनात गाई-बैलांना अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यांच्या श्रमामुळे शेतीची अनेक कामे सुलभ होतात. त्यामुळे वर्षातून एकदा तरी त्यांची विशेष पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा ग्रामीण संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करते.
आधुनिकतेच्या युगात अनेक पारंपरिक प्रथा लोप पावत असताना मानकिवली गावातील तरुणांनी एकत्र येऊन ही परंपरा उत्साहाने जपली आहे. नव्या पिढीने आपल्या संस्कृतीशी आणि ग्रामीण परंपरांशी जोडलेले राहावे, तसेच पशुधनाचे महत्त्व समजून घ्यावे, असा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अशा प्रकारे मानकिवली गावात बलिप्रतिपदेच्या निमित्ताने गुरांचे पूजन, रंगीबेरंगी सजावट आणि पारंपरिक प्रथांच्या माध्यमातून गुरांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उपक्रमामुळे गावातील सांस्कृतिक परंपरेला उजाळा मिळण्याबरोबरच पशुधनाप्रती प्रेम आणि कृतज्ञतेची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली.







