२७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप
व्हीलचेअर, कॅलीपर, कुबड्या, कृत्रिम हातही मिळणार मोफत
मोतीराम पादीर | कर्जत:
कर्जत तालुक्यातील मैत्रीबोध परिवार कामतपाडा जांबरुंग आणि मैत्री आदर्श ग्राम या उपक्रमांतर्गत, टाटा ऑटो कॉम्प सिस्टम, पिनॅकल इंडस्ट्रीज पुणे आणि श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती यांच्या सहकार्याने कर्जत येथील रॉयल गार्डन येथे दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम जयपूर फूट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यामध्ये शारीरिकदृष्ट्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव, जयपूर फूट तसेच व्हीलचेअर, कॅलीपर, कुबड्या, कृत्रिम हात व अन्य सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यासह कल्याण, ठाणे, मुरबाड, खोपोली, लोणावळा, कर्जत, अलिबाग, पेण, पनवेल आणि आजूबाजूच्या गावातील सर्व गरजू दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क
मयूर – 9225929761
वैभव – 7758806778
नितीन – 9860496591
नोंदणीसाठी आपले नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक त्वरित कळवावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.







