दोन संस्थांकडून फराळाचे वाटप
मोतीराम पादीर | कर्जत:
आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था आणि आदिवासी ठाकूर समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथील माणगाव वाडीतील ८० आदिवासी कुटुंबांना दिपावली भाऊबीज निमित्त दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
दुर्गम भागातील गरजू कुटुंबांना दिवाळीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माणगाववाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.फराळ मिळाल्याने लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

या कार्यक्रमाला आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादा पादीर, आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष कांता पादीर,उपाध्यक्ष अर्जुन केवारी,सचिव नितीन निरगुडा,महिला अध्यक्ष जयवंती हिंदोळे यांच्यासह सुनील पारधी,गणेश पारधी, मधुकर ढोले, दत्तात्रय हिंदोळे,सोमा निरगुडे,बाळू भगत,मंगळ केवारी, बबन निरगुडा,सुरेश केवारी,उत्तम पादीर,दशरथ निरगुडा, विजय बांगारे,जयवंत उघडे, तातू पादीर,राम बांगारे,तुळशीराम निरगुडा, पत्रकार मोतीराम पादीर, पत्रकार नितीन पारधी आदी उपस्थित होते.
सभासदांनी स्व-इच्छेने दिलेल्या देणगीतून हा उपक्रम राबविण्यात आला. देणगीदारांचे आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आयोजकांनी आभार मानले.








