दीपक बोराडे | नेरळ:
अँटी करप्शन बोर्ड ट्रस्ट नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तृतीय राज्यस्तरीय अधिवेशन व गुणगौरव सोहळा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथे उत्साह पूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण भारत तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अँटी करप्शन बोर्ड चे शेकडो पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित झाले होते. या रायगड टीम कडून या कार्यक्रमाचे सुंदर शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते.
अँटी करप्शन बोर्ड (ACB) रजिस्टर दिल्ली आणि उपभोक्ता एवम मानव अधिकार रक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तिसरे अधिवेशन अत्यंत उत्साह पूर्ण आणि यशस्वी वातावरणात पार पडले. हे केवल एक अधिवेशन नव्हते तर भ्रष्टाचारा विरोधात लढा देणाऱ्या प्रत्येक युद्धाला नवीन ताकद आणि दिशा देणारा ऊर्जासोहळा ठरला. अँटी करप्शन बोर्ड चे पद हे केवल नाव किंवा ओळख नसून ती समाजाला न्याय मिळवून देण्याची मोठी ताकद आहे.
या अधिवेशनात सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान व गुणगौरव करण्यात आला. तसेच विविध पदव्या व जबाबदाऱ्या प्रदान करून नव्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून समाजासाठी निस्वार्थपणे वेळ देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटनेचे कार्य पोचविणे उद्दिष्ट घेऊन पदाधिकारी कार्यरत आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांची मेहनत आणि समाजसेवेची प्रमाणिक भावना यांच्या बळावर संघटनेची वाटचाल अधिक व्यापक होत आहे.
सन्मानातून प्रेरणा मिळते मार्गदर्शनातून दिशा मिळते आणि एकजुटीतून संघटनेची ताकद निर्माण होते या भावनेने अँटीकरप्शन बोर्ड ट्रस्टच्या महाराष्ट्रातील कार्याला या अधिवेशनातून नवी दिशा मिळाल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाचे नियोजन रायगड टीमकडून करण्यात आले होते. आर के जैन, यांच्या मार्गदर्शनातून अण्णासाहेब खैरनार यांच्या नेतृत्वाने आयोजन करण्यात आले होते. तसेच स्टेट ऑर्गनायझेशन सेक्रेटरी भरत राणे, स्टेट प्रेस सेक्रेटरी रामदास माळी, रायगड जिल्हा अध्यक्ष काशिनाथ धुळे, या पदाधिकाऱ्यांच्या अथांग परिश्रमातून या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
भारत तसेच महाराष्ट्र राज्यातील 61 पुरस्कार त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर रायगड मधून 17 जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉक्टरेट पुरस्कार विनायक वसंत पाबळे, तसेच विश्वनाथ रामचंद्र पाटील, महाराष्ट्र उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार संतोष मोतीराम पेरणे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, भरत पांडुरंग राणे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार टी एस देशमुख, महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार रमेश शांताराम कदम, व रोहिदास हरिश्चंद्र माळी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिलिंद परशुराम विरले, रोशनी गुलवी, महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार संतोष कोंडू धुले,महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्कार धनराज भीमराव अहिरे, रवींद्र हेमा पष्टे, निलेश जोशी, उत्कृष्ट गायक पुरस्कार हरेश तांबोळी, उत्कृष्ट कळारत्न पुरस्कार रामदास सोनवले, कोकण भूषण पुरस्कार रामदास जनार्दन माळी, व राजाराम गरजे,रायगड भूषण पुरस्कार काशिनाथ धुळे व राजाराम गरजे, उत्कृष्ट सरपंच पुरस्कार आरती पांडुरंग राणे, अशा अनेक महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास गायकवाड यांच्याकडून करण्यात आले. तसेच कार्यक्रमामधील उपस्थित मान्यवर पुरस्कारार्थी व प्रेक्षक यांचे स्वागत सुमधुर गायनाने हरेश तांबोळी व यांच्या म्युझिकल ग्रुप कडून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष राम कुमार जैन, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ज्योती जैन, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अण्णासाहेब खैरनार, कर्जत डी वाय एस पी राहुल गायकवाड, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे, राष्ट्रीय महासचिव दयानंद निकम, राष्ट्रीय सचिव रविदास बाविस्कर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णात महामुनी, राज्य उपाध्यक्ष देवेंद्र देशमुख, स्टेट ऑर्गनायझेशन सेक्रेटरी भरत राणे, स्टेट प्रेस सेक्रेटरी रामदास माळी, रायगड जिल्हा अध्यक्ष काशिनाथ धुळे, वीरकर सूर्यकांत, आगरी समाज संघटना कर्जत अध्यक्ष संतोष पेरणे, पत्रकार किशोर गायकवाड,महाराष्ट्र किसान क्रांती संघटना अध्यक्ष टी एस देशमुख, किसान क्रांती संघटनेचे सदस्य, अँटी करप्शन बोर्ड चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर के जैन (नॅशनल प्रेसिडेंट) – अँटीकरप्शन बोर्ड चे पदाधिकारी आणि सदस्य यांचे एकत्र कुटुंब तयार झाले आहे त्यांच्या एकत्र येण्याने मजबूत आणि एक संबंध एसीपी कुटुंबात निर्माण झाले आहे. ही संघटित शक्ती आपल्या अभिमानाचा खरा पाठीचा कणा आहे. पद हे केवळ नाव किंवा ओळख नसून ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रदान करण्यात आले आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी भ्रष्टाचाराचे सावट दूर फेकून एक सक्षम सुशिक्षित आणि समृद्ध समाज अँटी करप्शन बोर्डच्या माध्यमातून घडवायचे आहे.
राहुल गायकवाड (DYSP) – समाजामध्ये चांगली मूल्य आणि चांगली कामे करणारे माणसांची खूप गरज आहे. आपल्या संघटनेचा उद्देश रास्त आहे. प्रत्येक भ्रष्ट आचरण याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे. आणि ही शिकवण आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना देत आहेत. आणि त्यांना समाजासाठी चांगले कार्य करण्याचे मार्गदर्शन करत आहात. संघटनेच्या माध्यमातून खूप सुंदर कार्य चालू आहे.
तुम्ही आणि आम्ही हातात हात घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्यासाठी एकत्रितपणे काम करून सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्याकडून आज एक मी सकारात्मक ऊर्जा घेऊन जात आहे.







