लायन्स क्लब ऑफ सावर्डे आयडीयल अध्यक्ष डॉ.अजित गावकर यांचा स्तुत्य उपक्रम
दिपक कारकर | चिपळूण:
दिपक कारकर | चिपळूण:
मंगळवार दि. ०८ सप्टेंबर २०२६ रोजी वहाळ येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वहाळ क्र.१ ह्या शाळेत, इ.पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते.
या शिबिरामध्ये एकूण ३० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान ५ विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. योग्य वेळी तपासणी झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील योग्य मार्गदर्शन व उपचारासाठी मदत होणार आहे. असे प्रतिपादन डॉ.अजित गावकर यांनी करत विद्यार्थ्यांना डोळ्यांचे महत्त्व, डोळ्यांची काळजी आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याबाबत सर्वोत्तम मार्गदर्शन केले.

नेत्रतज्ज्ञ डॉ. मित पिलणकर यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली.दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, सौ. नरोटे मॅडम व शिक्षिका सय्यद शेख उपस्थित होते. शाळेतील शिक्षकवृंद यांनी डॉ.अजित गावकर यांचे यथोचित स्वागत केले. संपूर्ण शिबिर अतिशय उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.







