वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम
हरिश्चंद्रजी यादव यांच्या स्मृतींना रुग्णसेवेतून अभिवादन
नरेश जाधव | कर्जत:
वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा कुशल शेतकरी उद्योजक दिवंगत हरिश्चंद्रजी यादव साहेब यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून दिवंगत हरिश्चंद्रजी यादव यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यादव कुटुंबीय तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा उपक्रम ठरला.

कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. दीपक अडकमोल, सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रवक्ते ॲड. कैलासजी मोरे, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्रजी मोरे, रायगड जिल्हा संघटक सुनीलजी गायकवाड, तालुकाध्यक्ष प्रदीपजी ढोले, तालुका उपाध्यक्ष आनंदजी खैरे, तालुकासचिव शैलेशजी खोब्रागडे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष प्रकाशजी गायकवाड, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंताजी गायकवाड, संस्कार उपाध्यक्ष उल्हासजी जाधव तसेच पत्रकार संजयजी अभंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय दिनेशजी लवंडे, शरदजी गायकवाड, सुनीलजी मोरे, अनिकेतजी गायकवाड, कमलाकर जाधव, सुनीलजी वाघमारे, सुरेशजी कांबळे, दीपकजी जाधव, बाळाराम गवळे, नितीन गायकवाड, मारुती शिंदे, वर्षाताई खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

दिवंगत हरिश्चंद्रजी यादव यांचे सुपुत्र लोकेश हरिश्चंद्र यादव, प्रणेश हरिश्चंद्र यादव, तसेच कन्या व जावई आम्रपालीताई व रुपेश सोनावणे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.
दिवंगत हरिश्चंद्रजी यादव हे सामाजिक जाणीव असलेले, कुशल शेतकरी उद्योजक आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता रुग्णसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना हा उपक्रम आगळ्या पद्धतीने अभिवादन करणारा ठरला.

उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. सामाजिक कार्य, रुग्णसेवा आणि गरजूंच्या मदतीचा हा संदेश पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.







