पावसाळ्यातील सेवेला मानवंदना
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी आणि कार्याचा गौरव करण्यासाठी उपक्रम
नरेश जाधव / कर्जत:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने नेरळ ग्रामपंचायत कार्यालयातील सफाई कामगार बंधू-भगिनींना रेनकोटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे तसेच रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष सतीश कालेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांच्या आरोग्याची आणि परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कामगारांच्या कार्याला सलाम म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देण्याबरोबरच पावसाळ्यात त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे, महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार सरचिटणीस सिद्धी आंगणे, कर्जत तालुका अध्यक्षा दर्शना कालेकर, नेरळ शहराध्यक्ष हेमंत चव्हाण, उपतालुका संघटक जितेंद्र रुठे, विनोद शेंडे, अमोल कालेकर, किरण राणे, किशोर कालेकर, नारायण कालेकर, शाखाध्यक्ष बिरदोले, नमिता कालेकर, पंकज बुंधाटे, भालचंद्र राणे, चंदू राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल सफाई कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानत उपक्रमाचे कौतुक केले.








