नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड
१९८५ पासूनची सामाजिक वाटचाल कायम
मोतीराम पादीर | कर्जत:
कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि हक्कांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या आदिवासी ठाकूर समाज संघटना, कर्जत या संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड रविवारी (दि. २६ जुलै) रामाचीवाडी येथील धानकोबा मंदिर परिसरात पार पडली. तालुक्यातील समाजबांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेल्या बैठकीत कांता भिका पादीर यांची संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
सह्याद्री आदिवासी ठाकूर-ठाकर समाज उन्नती मंडळ, महाराष्ट्र राज्य, ठाणे यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल ४ जून २०२६ रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर नव्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी आयोजित बैठकीत सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष : कांता भिका पादीर
उपाध्यक्ष : अर्जून नागो केवारी, लक्ष्मण उघडा
सचिव : नितीन निरगुडा, राकेश कवठे
खजिनदार : भरत तुकाराम पादीर, दिनेश पिंगळा
महिला अध्यक्षा : जयवंती दत्तात्रेय हिंदोळा
महिला उपाध्यक्षा : निलम वसंत ढोले
प्रसिद्धी प्रमुख : मोतीराम पादीर, नितीन पारधी
बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष परशुराम दरवडा यांनी अध्यक्षपदाची धुरा नवनिर्वाचित अध्यक्ष कांता पादीर यांच्याकडे औपचारिकरित्या सोपवली. उपस्थित समाजबांधवांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत आगामी काळात समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
सन १९८५ मध्ये स्थापन झालेली आदिवासी ठाकूर समाज संघटना, कर्जत ही संस्था गेल्या चार दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. आदिवासी समाजातील विविध प्रश्न सोडविणे, समाजबांधवांना न्याय मिळवून देणे, शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणे आणि सामाजिक एकोपा वाढविणे या उद्दिष्टांसाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे. आज या संस्थेचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून समाजाच्या विकासासाठी ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संघटनेच्या सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळेल, तसेच आदिवासी ठाकूर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवे नेतृत्व प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.

hdrForward: 0; shaking: 0.000000; highlight: 1; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask: 8;
brp_del_th: 0.0005,0.0001;
brp_del_sen: 0.1000,0.1000;
delta:1;
bokeh:1;
module: portrait;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 274.42865;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 65536;weatherinfo: weather:null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;zeissColor: bright;







