अनधिकृत बांधकामे, बेकायदा पार्किंग आणि अतिक्रमणांनी बाजारपेठ गुदमरली
नेत्यांचे हजारोंचे जाहिरातबाजीचे बॅनर झळकतात; मात्र रस्त्यांवरील खड्डे दिसत नाहीत?
नरेश जाधव | कर्जत:
कर्जत तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेळे गावाच्या प्रवेशद्वारावरच सध्या जीवघेण्या खड्ड्यांनी वाहनधारकांचे स्वागत होत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करत मार्गक्रमण करावे लागत असून, एखाद्या क्षणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन नेमके कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
कशेळे हे केवळ गाव नसून कशेळे खोंड्यातील सुमारे ५० ते ६० खेड्यापाड्यांतील नागरिकांसाठी प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक येथे बाजारहाट, खरेदी-विक्री तसेच विविध शासकीय आणि दैनंदिन कामांसाठी ये-जा करतात. मात्र, बाजारपेठेतील सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजारपेठेत अनधिकृत बांधकामांचा विळखा
कशेळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्तपणे होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतून चालत जाणे देखील अनेकदा कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एसटी बस थांबाही अडचणीत
कशेळे बाजारपेठेतील एसटी प्रवासी बस थांब्याच्या जागेवरही अतिक्रमण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना बसची वाट पाहण्यासाठी रस्त्यावरच उभे राहावे लागते. उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यात पावसाचा मारा सहन करत प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0223,0.0000;
brp_del_sen:0.1300,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (11, 0);aec_lux: 126.74611;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 42;
प्रवेशद्वारावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे
यात भर म्हणजे कशेळे गावाच्या प्रवेशद्वारावरच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची अवस्था इतकी गंभीर आहे की, वाहनचालकांना वाहने अक्षरशः खड्डे चुकवत चालवावी लागत आहेत. दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती विशेष धोकादायक असून, पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो.
रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी आहेत की खड्ड्यांमधून मार्ग काढण्याच्या सरावासाठी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (11, 0);aec_lux: 121.7796;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 65537;weatherinfo: null;temperature: 42;
बॅनर झळकतात, पण खड्डे का दिसत नाहीत?
कशेळे गावासह कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. मात्र, या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणेचे पुरेसे लक्ष नसल्याची नागरिकांची भावना आहे.
विशेष म्हणजे, रस्त्यांच्या दुतर्फा राजकीय नेते आणि पुढाऱ्यांच्या जाहिरातींचे मोठमोठे बॅनर सहजपणे दिसतात; मग त्याच रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे संबंधितांना का दिसत नाहीत? असा बोचरा सवाल संतप्त नागरिक आणि वाहनधारक करत आहेत.
जाहिरातींसाठी हजारो रुपये खर्च करणाऱ्या राजकीय मंडळींनी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी किमान नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी रस्ते दुरुस्तीचा प्रश्नही तितक्याच गांभीर्याने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राजाराम शेळके यांच्या पुढाकाराची नागरिकांना अपेक्षा
दरम्यान, कशेळे गावातील अतिक्रमणांचा प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाला होता. सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी राजाराम शेळके यांनी स्वतः पुढाकार घेऊन कशेळे गावातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न केले होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात येत आहे.
सध्या त्यांच्या सुनबाई जिल्हा परिषद सदस्य असल्याने, राजाराम शेळके यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन कशेळे बाजारपेठेतील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
कशेळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे करणे, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांबाबत नियमानुसार कारवाई करणे, एसटी बस थांब्याची जागा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देणे आणि प्रवेशद्वारावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविणे, या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
एखादा मोठा अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्याआधीच प्रशासनाने जागे होऊन नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी कशेळेकरांची मागणी आहे.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (20, 0);aec_lux: 136.88316;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 42;







