सत्तराव्या वर्षी स्थापन झालेल्या गणरायाचे बाराव्या दिवशी मोठ्या उत्साहात विसर्जन
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात माणकिवलीत गणरायाला भावपूर्ण निरोप
ग्रामस्थ, महिला व तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | माणकिवली:
कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली गावातील गणेशभक्त संजय हरिभाऊ गंगावणे यांच्या घरी सत्तराव्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या गणरायाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाराव्या दिवशी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणरायाच्या विसर्जनानिमित्त गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण माणकिवली गावात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ, महिला, युवक तसेच बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. भक्तिगीतांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

algolist: 0;
multi-frame: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 322.54773;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 40;
मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांनी भक्तिगीतांच्या तालावर नृत्य करत आनंद व्यक्त केला. महिला आणि तरुणाईनेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणरायाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही विसर्जन मिरवणूक कडाव गावातील गोपाळ तलावाच्या दिशेने नेण्यात आली.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 183.26103;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 44;
गणरायाच्या विसर्जनाची वेळ जवळ येताच भक्तिमय वातावरणात भावनिक क्षण निर्माण झाला. अनेक दिवस घरामध्ये भक्तिभावाने विराजमान असलेल्या बाप्पाला निरोप देताना ग्रामस्थ, महिला आणि तरुणाई भावूक झाली. ‘बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक देत भक्तांनी गणरायाला निरोप दिला.
यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून कडाव येथील गोपाळ तलावात गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. यावेळी उपस्थित गणेशभक्तांनी पुढील वर्षीही त्याच उत्साहाने आणि श्रद्धेने गणरायाचे स्वागत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
सत्तराव्या वर्षी स्थापन झालेल्या या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमुळे माणकिवली गावातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडले.







