कर्जतमध्ये ५४९ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
राजाभाऊ कोठारी यांच्या पुढाकारातून कर्जतमध्ये रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
श्री धापया देवस्थान समिती, कर्जत आणि एमजीएम हॉस्पिटल, कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने राजाभाऊ कोठारी यांच्या पुढाकारातून रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी धापया मंगल कार्यालय, कर्जत येथे ५४९ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या उपक्रमांतर्गत नाक, कान व घसा तपासणी शिबिरात सुमारे ७५ नागरिकांनी, तर ईसीजी व अँजिओग्राफी तपासणी शिबिरात ५५ नागरिकांनी सहभाग घेतला. रक्त संकलनाचे काम एमजीएम हॉस्पिटलच्या रक्त केंद्रातील डॉक्टर व तंत्रज्ञांनी, तर आरोग्य तपासणीचे काम हार्मनी फाऊंडेशन आणि सुश्रुषा हॉस्पिटलच्या आरोग्य पथकाने केले.
या प्रसंगी नगरपरिषदेचे गटनेते व बांधकाम सभापती महेंद्र चंदन, नगरसेवक प्रशांत ऊर्फ बाबू पाटील, नगरसेविका स्नेहा शिंदे, नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, जयवंत म्हसे, डॉ. प्रशांत सदावर्ते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव भानुसघरे, गणेश शिंदे, मुकेश पाटील, नितीन गुप्ता, प्रशांत पाटील, कुणाल भोबू, निलेश गायकवाड ,भाई आणेकर, रोहित भोबू, योगेश लोवंशी, सुधिर आढळ, हेमंत पवार, राजु वाळुंज, संतोष पिंगळे, प्रथमेश मगर, कुणाल गुप्ता, सुयोग मांडे, प्रसाद बोराडे, रोहिदास सुर्वे, जय दगडे, यश ठाकरे, आशिष पाटील, अमित गुप्ता, विजय पाटील, हेमंत जाधव, मंगेश भोईर, महेश सारडा, मंगेश भोईर यांच्यासह धापया देवस्थान समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘एकदा रक्तदान, देईल तिघांना जीवनदान!’ या संदेशातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. रक्तदाते, सहभागी नागरिक, आरोग्य पथक, मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.







